Congress pays tribute to the late Bharat Ratna Rajiv Gandhi on his death anniversary
चंद्रपूर :- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी Bharatratna Late Rajiv Gandhi यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय, राजुरा येथे राजुरा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. late Bharat Ratna Rajiv Gandhis death anniversary
कार्यक्रमात राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, शहर काँग्रेस अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु, सभापती तिरुपती इंदूरवार, सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाष्कर वाटेकर, न.प. सभापती अनंतकुमार ताजने, नगरसेवक एजाज अहमद, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अस्लम चाऊस, वामनराव वाटेकर, मतीन कुरेशी, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अशोक राव, मधुकर झाडे, मिथलेश रामटेके, कुणाल मोकळे, गुड्डू सय्यद, कबीर बेग, जुनेद शेख, नदिम शेख, सय्यद शाहिद यांच्यासह काँग्रेसच्या विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे Subhash Dhote यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांनी देशाला आधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकरण, दूरसंचार क्रांती आणि युवा नेतृत्वाची नवी दिशा दिली. ग्रामविकास, पंचायतराज व्यवस्था, नवोदय विद्यालय, आणि देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार आणि कार्य हे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी सदैव प्रेरणास्थान राहतील. देशाच्या एकात्मता, लोकशाही आणि प्रगत भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.
श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. राजीव गांधी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.