Thursday, May 21, 2026
HomeCrimeकोठारीत गुटखा माफियांवर एलसीबीचा धडक छापा

कोठारीत गुटखा माफियांवर एलसीबीचा धडक छापा

LCB Conducts Surprise Raid on Gutkha Mafia in Kothari

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा व पानमसाल्याच्या अवैध साठवणूक आणि विक्री विरोधात चंद्रपूर पोलिसांची धडक मोहीम सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) च्या राजुरा उपविभागीय पथकाने कोठारी पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करत तब्बल ९८ हजार ९३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. LCB Conducts Surprise Raid on Gutkha Mafia in Kothari

रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील 3 गुन्हे LCB ने केले उघड………

दिनांक २० मे २०२६ रोजी कोठारी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटख्याचा साठा करून त्याची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताच्या घर व दुकानावर अचानक छापा टाकला.

चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी सुभाष धोटे यांची फेरनिवड…….

या कारवाईत शासनाने बंदी घातलेल्या 7 विविध नामांकित कंपन्यांच्या सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ९८ हजार ९३९ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपी बंडू रामदास पहानपट्टे (वय ५३, रा. कोठारी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कोठारी येथे अप. क्र. १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन…….

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, अजय बागेसर, किशोर वैरागडे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर आणि वृषभ बारसिंगे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन
जिल्ह्यात कुठेही अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू किंवा अमली पदार्थांची विक्री अथवा साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular