Ramnagar Police Raid Stock of Illegal Gutkha, Flavored Tobacco, and Cigarettes
चंद्रपूर :- रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करून जेलबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. Ramnagar Police Station Raid
पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये गुन्हे शोध पथक अवैध धंदे व अंमली पदार्थांविरोधात कारवाईसाठी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृहाजवळ राहणारा अजय कुमार आपल्या राहत्या घरी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवत आहे. ‘पती पत्नी एकत्रीकरण’ हजारो अर्ज प्रलंबित…….
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपीच्या घरावर तसेच घरालगत असलेल्या पानठेल्यावर छापा टाकला. झडतीदरम्यान शासनाने बंदी घातलेला गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू आणि सिगारेट असा एकूण ५,४८,९९२ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७५ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील कलम ३०(२)(अ), २६(२)(i), २६(२)(iv), ५९ आणि सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ अंतर्गत कलम २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे पोउपनि कृष्णा दराडे सोबत पोस्टॉप पोहवा. आनंद खरात, रामप्रसाद नैताम, प्रकाश बलकी, शरद कुडे, जितेंद्र आकरे, मपोहवा मनिषा मोरे, पोशि संदिप कामडी, प्रकाश मडावी, सुरेश कोरवार, रविकुमार, प्रफुल्ल, पंकज पोंदे यानी केली.