Monday, May 25, 2026
HomeMaharashtraइरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

Launch of Phase 2 of the Irai River Deepening Campaign

चंद्रपूर :- चंद्रपूरच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. मात्र इरई नदीचे खोलीकरण दुर्लक्षित राहून गेले. त्यामुळे गतवर्षी 2025 मध्ये नदीचे खोलीकरण करण्याचा संकल्प केला. या संकल्पचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे. ही नदी आपली आहे, आपल्या शहराची आहे, ही आपली जीवनदायी आहे, अशी भावना ठेवून चंद्रपूरकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके Guardian Minister Dr. Ashok Uike यांनी केले. 2nd Phase of the Irai River Deepening Campaign

आयुक्त पालीवाल यांचा ‘टेंडर टेरेरिजम’ – चौकशी चे आदेश…..

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभाग येथे इरई नदीचे खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला महापौर संगीता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, उपमहापौर प्रशांत दानव, मनपा स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, प्रभागाचे नगरसेवक भालचंद्र दानव, किरण कोतपल्लीवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, उपायुक्त संदीप चिद्रावार, सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, शुभांगी सूर्यवंशी, सीटीपीएसचे प्रभारी मुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा मुबलक साठा……

खोलीकरणाचे काम यावर्षी लवकर सुरू करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, सर्वांनी ही नदी आपली आहे, असे समजण्याची गरज आहे. खोलीकरणासाठी लोकचळवळ निर्माण व्हावी. कोणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करावी. नदीच्या कामात चुका काढण्याची मानसिकता ठेवू नका. नदी ही कायम राहणार आहे, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. या नदीच्या खोलीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच कामात एका पैशाचाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री अशोक वुइके यांनी दिली. मनपाने प्रभागनुसार व यंत्रणानुसार वेळापत्रक तयार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार चषक 2026 – भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ….

यावेळी MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, नदी ही जीवनदायीनी आहे. चंद्रपूर शहरातून ही नदी वाहते. चार किलोमीटरचा खोलीकरणाचा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागामधूनच शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे कंत्राटदारांनी सर्वात प्रथम वेकोलीच्या ओव्हर बर्डनचा भाग कमी करण्याला प्राधान्य द्यावे. या भागात पूर संरक्षण भिंत बांधण्यात यावी. तसेच येथील घाटाकरिता एक कोटी रुपये उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे पूजन आणि खोलीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार उपायुक्त शेषराव टाले यांनी मानले.

असा आहे खोलीकरण कामाचा दुसरा टप्पा :

इरई नदी चंद्रपूर शहराला नऊ किलोमीटर समांतर वाहते. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात सन 2026 मध्ये चौराळा पूल ते माना टेकडी असे एकूण चार किलोमीटर लांबीपर्यंत खोलीकरण करण्यात येत आहे. यात 2 लक्ष 80 हजार टीसीएम गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे. गतवर्षी 2025 मध्ये पहिल्या टप्प्यात रामसेतू पूल ते चौराळा पूल पर्यंत अडीच किलोमीटर लांबीतून एकूण 82.61 टीसीएम गाळ काढण्यात आला होता.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular