Friday, April 17, 2026
HomeMNC Chandrapurकाँग्रेसकडून गटनेता राजेश अडूर यांना कारणे दाखवा नोटीस

काँग्रेसकडून गटनेता राजेश अडूर यांना कारणे दाखवा नोटीस

Congress issues show cause notice to Chandrapur Municipal Corporation group leader Rajesh Adur

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते राजेश अडूर यांना पक्षशिस्त भंग केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत. Congress issues show cause notice to group leader Rajesh Adur

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी ही नोटीस जारी केली आहे. नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस सदस्यांची नावे देताना पक्षाचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार तसेच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते.

मात्र, गटनेते राजेश अडूर यांनी याबाबत संबंधित नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुचविलेल्या नावांचा विचार न करता मनमानी पद्धतीने स्वतःच्या मर्जीने स्थायी समितीसाठी नावे दिल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

ही बाब पक्षशिस्तीचा भंग करणारी व अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत, काँग्रेस पक्षाकडून अडूर यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रांताध्यक्षांकडे लेखी खुलासा सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

निर्धारित मुदतीत खुलासा न केल्यास किंवा सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधितांवर पक्षशिस्त भंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे.

दरम्यान, या नोटीसमुळे चंद्रपूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular