Monday, May 25, 2026
HomeMPखासदार प्रतिभा धानोरकर यांची 'भारत - उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा'वर निवड

खासदार प्रतिभा धानोरकर यांची ‘भारत – उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा’वर निवड

Appointed as a member of the India-Uzbekistan Parliamentary Friendship Group

चंद्रपूर :- खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांची ‘भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटा’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, लोकसभेच्या माननीय अध्यक्षांच्या सूचनेनुसार ही निवड जाहीर झाली आहे. Appointed as a member of the India-Uzbekistan Parliamentary Friendship Group

लोकसभा सचिवालयाकडून (परिषद आणि शिष्टाचार शाखा) यासंदर्भातील अधिकृत पत्र खासदार प्रतिभा धानोरकर यांना प्राप्त झाले आहे. भारत आणि उझबेकिस्तान या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, दोन्ही राष्ट्रांमधील सांस्कृतिक व राजकीय देवाणघेवाण वाढवणे, हा या मैत्री गटाचा मुख्य उद्देश आहे.

या महत्त्वाच्या निवडीबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असून, कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी MP Rahul Gandhi, कॉंग्रेस नेत्यां खासदार प्रियंका गांधी, MP Priyanka Gandhi यांचे त्यांनी आभार मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular