Friday, April 17, 2026
HomeMaharashtraलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांच्या न्यायासाठी आयुष्य घालवले

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांच्या न्यायासाठी आयुष्य घालवले

Democratic activist Annabhau Sathe spent his life working for justice for the underprivileged

चंद्रपूर : मातंग समाज सेवा समिती, चंद्रपूर च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला. स्थानिक बिनबा वार्ड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहामध्ये अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले. Democratic activist Annabhau Sathe spent his life working for justice for the underprivileged

सदर कार्यक्रमास समाजभुषण व अण्णाभाऊ साठे स्मृतीभुषण पुरस्काराचे मानकरी राजुभाऊ येले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या जयंती सोहळ्याला अरूण कांबळे, प्रशांत डोंगरे, अजय येले, रविंद्र डोंगरे, बंडू पायघन, पंडितराव पायघन, अशोक वानखेडे , सतिश डोंगरे, गोपाल पडघाने, किशोर वानखेडे, ताईबाई डोंगरे, साक्षी डोंगरे, विना येले, शारदा गवळी, शितल येले, काजल उचले यांचेसह अन्य समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी राजु येले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत त्यांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व कामगार विश्वातील त्यांच्या कार्याविषयी उपस्थित समाजबांधवांना माहिती दिली. अण्णाभाऊंचे कार्य पददलीत व विकासापासून कोसोदूर असणाऱ्या समाजाच्या उत्थानाकरिता होते. त्यांनी आपल्या साहित्यातून वंचितांचे प्रश्न मांडून त्यांना जगण्याची नवी दिशा प्रदान केली असेही राजु येले यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

यावेळी अरूण कांबळे यांनी सुध्दा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्वातंत्र्य समरातील योगदानाबाबत अत्यंत सविस्तरपणे माहिती देवून अण्णाभाऊंच्या विचाराचा वारसा मातंग समाज बांधवांनी चालवून समाजाच्या उन्नतीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमानंतर समाजबांधवांनी रॅली द्वारा वार्डातील अण्णाभाऊ साठे चौकात येवून तेथील स्मृतीस्थळास माल्यार्पण करून या महानविभुतीस अभिवादन केले. सदर कार्यक्रमास मातंग समाजातील युवक, युवती व आबालवृध्द बहुसंख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular