Demarcation of 14 villages on the Maharashtra-Telangana border and preparation of land records
चंद्रपूर :- महाराष्ट्र – तेलंगाणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमांकनाबाबत मंत्री (महसूल) महोदयांचे अध्यक्षतेखाली दिनांक २३/०२/२०२२ रोजी बैठक आयोजित करून सदर प्रस्ताव मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांचे अवलोकनार्थ सादर करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सदर प्रस्तावाचे अवलोकन झाल्यानंतर दिनांक २३/०२/२०२२ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृताप्रमाणे महाराष्ट्र – तेलंगाणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील त्या १४ गावांची मोजणी करून सीमांकनाचे कार्यवाही करण्याबाबतचे संदर्भीय पत्र महसूल विभागाचे अप्पर सचिव यांनी जमाबंदी आयुक्त व संचालक, भुमी अभिलेख पुणे यांना देऊन जवळपास ३ वर्षाचा कालावधी लोटून गेला मात्र अजूनपर्यंत गावाचे नकाशे, इजाफा, आकारबंद असा कोणताही रेकार्ड तयार करण्यात आलेला नाही. Demarcation of 14 villages on the Maharashtra-Telangana border and preparation of land records
१४ गावांच्या जमीन मोजणीचा सर्व डाटा भुमी अभिलेख कार्यालयाच्या सॉफ्टवेअर मध्येच बंदिस्त आहे. जमीन मोजनी नंतरची विभागाकडून पुढील कोणतीच ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे या १४ गावांच्या जमिनीचे रेकार्ड अद्यापी तयार झालेले नाहीत, जमीन मोजणीनंतरच्या पुढील कार्यवाहिस विलंब होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे. Former MLA Subhas Dhote’s demand to the Revenue Minister Chandrashekhar Bawankule
महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचे सीमाकन करून तात्काळ भुमी अभिलेख तयार करून देणेबाबतचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजुऱ्याचे माजी तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष, सुभाष धोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
