Thursday, April 16, 2026
HomeAccidentचंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अँजियोग्राफी, अँजियोप्लास्टी उपचाराची सोय उपलब्ध करा

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अँजियोग्राफी, अँजियोप्लास्टी उपचाराची सोय उपलब्ध करा

Provide facilities for angiography and angioplasty treatment at Chandrapur Government Medical College

चंद्रपूर :- चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोग (cardiology) विभागाअंतर्गत अँजियोग्राफी, अँजियोप्लास्टी आणि हृदयावर बायपास शस्त्रकीया करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी निवेदनद्वारे मागणी केली.

चंद्रपूर जिल्हा एक औद्योगिक जिल्हा असून राज्याच्या तिजोरीत वने, खनिज व इतर माध्यमातून भरघोस उत्पन्न करवून देणारा जिल्हा आहे. परंतु या औद्योगिकी करणामुळे राज्यात आणि देशात सर्वाधिक प्रदूषित जिल्हा म्हणून चंद्रपूर कुप्रसिद्ध आहे, उद्योगांमुळे जिल्ह्यात या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, कंत्राटी कामगार आणि गरिबांची संख्या मोठी आहे, प्रदूषणामुळे दमा, त्वचारोग, कॅन्सर,आणि हृदयरोग झपाट्याने वाढत आहेत.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोगांवरील अँजिओग्राफी, अँजियोप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया याची सोय नसल्यामुळे गरीब रुग्णांना स्थानिक खाजगी रुग्णालयात किंवा नागपूर, मुंबई, हैदराबाद या शहरांमध्ये जावून ह्रदयरोगावरील उपचार करावे लागत आहे, त्यामुळे प्रचंड आर्थिक ताण जिल्ह्यातील गरीब – सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे. Provide facilities for angiography and angioplasty treatment at Chandrapur Government Medical College

नुकतेच चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे झाले, त्यामुळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.श्री.हसन मुश्रीफ यांची भेट घेवून त्यांच्याशी चंद्रपुर वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या वैद्यकीय सोईंबाबत सविस्तर चर्चा केली आणि चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयरोगांवरील सर्व उपचार शासकीय खर्चात नागरिकांना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी तात्काळ योग्य आणि जनहितार्थ मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, आणि तात्काळ चंद्रपूरच्या महाविद्यालयाच्या डीन (प्राचार्य) यांना फोन लावून आणि पत्र पाठवून याविषयावरील (हृदयरोग) संपूर्ण अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आणि यासंदर्भात अहवाल आल्याबरोबर तो प्रस्ताव आणि त्याला लागणारा खर्च, आवश्यक तज्ञ डॉक्टर्स यांना मंजुरी देण्याचे मान्य केले.

यावेळी कोल्हापूर आर्किटेक्ट आणि इंजी.असो.चे अध्यक्ष इंजी.अजय कोराने, राष्ट्रवादीचे पदाधिकारी दीपक बुजाडे, रक्षित माखिजा उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular