Friday, April 17, 2026
HomeAgricultureसेंद्रिय शेतीद्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती काळाची गरज.

सेंद्रिय शेतीद्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती काळाची गरज.

Environmentally friendly sustainable agriculture through organic farming is the need of the hour

चंद्रपूर :- धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, चंद्रपूर आणि विकासगंगा समाजसेवी संस्था, घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती द्वारे पर्यावरणपूरक शाश्वत शेती हा प्रकल्प पांढरकवडा, वढा, धानोरा, अंतूर्ला, येरुर, सोनेगाव, शेनगाव, मोरवा, ताडाळी, चारगाव, या गावामध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.

देवेश कुमार (मुख्य महाप्रबंधक धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी जनजागृती करणे जागतिक पर्यावरण दिनाचे World Environment Day औचित्य साधून पांढरकवडा या गावांमध्ये वृक्षरोपण करून साजरा करण्यात आला व दशपर्णी अर्कचा डेमो देऊन त्यांना शेतीमध्ये होणार खर्च व त्याच बरोबर जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस खराब होत आहे, आणि पर्यावरणवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, तो कुठे थांबवून तरी शेतकऱ्याचा खर्च कमी करून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे, हे शेतकऱ्यांना समजून सांगण्यात आले. Environmentally friendly sustainable agriculture through organic farming is the need of the hour

शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून विकासगंगा समाज सेवी संस्थेच्या पुढाकाराने प्रत्येक शेतकऱ्यांना कापूस पीकाविषयी सेंद्रिय शेतीबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येईल तसेच प्रत्येक जैविक औषधीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येतील.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनिष नायर (मुख्य व्यवस्थापक ,धारीवाल), धीरज ताटेवार (उपव्यवस्थापक, धारीवाल) सूरज तोतडे (सरपंच, पांढरकवडा), एच. एन.कोरडे मॅडम (ग्रामसेवक), रामटेके सर (पशुवैद्यकीय अधिकारी) हे मान्यवर उपस्थित होते.

तसेच गावातील शिक्षकवृंद, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी सखी, बालसखी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश कामतवार यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय दळवी, मिथुन कलसार, पूजा चतुर, मंजुषा काकडे यांनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात या चळवळीला आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

तसेच गावातील शिक्षकवृंद, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी सखी, बालसखी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular