Wednesday, June 3, 2026
HomeAgricultureजागतिक पर्यावरण दिन ग्राम पंचायत पांढरकवडा येथे उत्साहात साजरा

जागतिक पर्यावरण दिन ग्राम पंचायत पांढरकवडा येथे उत्साहात साजरा

World Environment Day celebrated with enthusiasm at Gram Panchayat Pandharkawada

चंद्रपूर :- ग्राम पंचायत पांढरकवडा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण जतनासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर आणि ग्राम पंचायत पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रम देवेश कुमार (मुख्यमहाप्रबंधक, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी जनजागृती करणे, पर्यावरणाच्या गंभीर समस्यांवर (जसे की प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल) लक्ष वेधणे आणि समाजाला कृती करण्यासाठी प्रेरित करणे हा होता. World Environment Day celebrated with enthusiasm at Gram Panchayat Pandharkawada

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनीष नायर (मुख्य व्यवस्थापक, धारिवाल), धीरज ताटेवार (उपव्यवस्थापक, धारिवाल), सूरज तोतडे (सरपंच, पांढरकवडा), एच. एन. कोरडे मॅडम (ग्रामसेवक), रामटेके सर (पशुवैद्यकीय अधिकारी) हे मान्यवर उपस्थित होते.

तसेच गावातील शिक्षकवृंद, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी सखी, बालसखी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांची उत्स्फूर्त उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश कामतवार यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय दळवी, मिथुन कलसार, पूजा चतुर, मंजुषा काकडे यांनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात या चळवळीला आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular