Launch of the Developed Agriculture Resolution Mission
यवतमाळ :- कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन व ईफको यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
सदर अभियान दि.१२ जून पर्यंत एकून १५ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञानाची जनजागृती तसेच नवीन पिक प्रकार आणि शासकीय योजनांची माहिती तसेच मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, वणी, पांढरकवडा, झरी जामनी या नऊ तालुक्यात देण्यात येत आहे. Launch of the Developed Agriculture Resolution Mission

अभियाना दरम्यान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत असून अभियानाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. अभियानादरम्यान दररोज दोन फिरत्या कृषी रथांच्या माध्यमातून १००० ते ११०० शेतकरी बांधवांशी थेट संपर्क साधून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे.
यवतमाळात भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने हत्या
अभियाना प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, ॲक्शन फॉर फूड प्रोडक्शन, ईफकोचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून गावोगावी मार्गदर्शन तसेच येणाऱ्या खरीप हंगामाबाबत काय करावे आणि काय करू नये तसेच पिक लागवडी करिता घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देत आहेत. खरीप हंगामाच्या मुहूर्तावर या अभियानामुळे शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन लाभत आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवा
अभियानामुळे शेतकरी प्रोत्साहित होवून या अभियानास प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे, असे कृषि विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी कळविले आहे.
