Youth murdered in broad daylight in Yavatmal
यवतमाळ :- शहरातील मध्यवस्तीत युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मनीष शेंद्रे (२७ वर्ष) रा. अंबिका नगर, पाटीपुरा असे मृतक युवकाचे नाव आहे. Yavatmal Crime
यवतमाळ शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मधील महादेव मंदिरामागील परिसरात युवक मनीष शेंद्रे यावर काही युवकांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याला जागेवरच ठार केल्याची खळबळजनक घटना आज दिनांक ३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
यवतमाळ पोलिसांना घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.

सदर प्रकरण जुन्या वैमनस्यातून घडले असल्याचे पोलिसांच्या निष्कर्षणात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्राकडून कळाले आहे
