Implement a large-scale tree plantation program during the monsoon – District Collector Vikas Meena
यवतमाळ :- वृक्ष लागवड काळाची गरज आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र नियोजन करा. या पावसाळ्यात जिल्ह्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना District Collector Vikas Meena यांनी दिले. Implement a large-scale tree plantation program during the monsoon
यवतमाळात भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने हत्या
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, सामाजिक वनीकरणच्या विभागीय वनअधिकारी प्रणिता पारधी, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर मडावी यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्ह्यात येत्या पावसाळ्यात 4 हजार 188 हेक्टरवर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात वन विभाग पुसद 77 हेक्टर, वन विभाग पांढरकवडा 302 हेक्टर, वन विभाग यवतमाळ 559 हेक्टर, सामाजिक वनीकरण विभाग 50 हेक्टर तर जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये 3 हजार 200 हेक्टरवर वृक्ष लागवडीचा समावेश आहे. यात राज्य शासनाकडून पुन्हा लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिक वृक्ष लागवडीची तयारी ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
वृक्षांची लागवड करतांना उत्पादनक्षम वृक्षांना प्राधान्य द्या. प्रत्येक तालुक्यात 2 ते 3 प्रकारच्या वृक्षांची लागवड करा. त्यासाठी क्लस्टर करण्याता यावे. वन विभागाने आपले नियोजन करतांना तालुकास्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची समिती तयार करून त्या समितीने लागवडीचे क्षेत्र, प्रमाण व आवश्यक वृक्षांची मागणी नोंदवावी. लागवड करण्यात आलेले वृक्ष पुढे जगतील यासाठी प्राधान्याने दक्षता घेण्यात यावी.
ज्या ग्रामपंचायतींकडून अद्याप वृक्ष लागवडीचे प्रस्ताव सादर झाले नसतील, त्यांनी ते तातडीने सादर करावे. गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींचे एकत्रित प्रस्ताव द्यावे. वृक्ष लागवड करतांना गावकरी, शाळा, सरकारी अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था यांचा सहभाग घ्या. जास्तीत जास्त वृक्ष जगविण्याबाबत संबंधितांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. जिल्ह्यात ई-क्लास जमीनी आहेत, याठिकाणी गावकऱ्यांच्या सहभागाने वृक्ष लागवड करता येतील का ते तपासण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
