Agriculture Mission Chairman visits suicide-affected families and banks in Ralegaon
यवतमाळ :- वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी राळेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना suicide-affected families भेटी दिल्या. तसेच बॅंकांना भेटी देऊन पिककर्ज वाटपाची पाहणी केली. Agriculture Mission Chairman visits suicide-affected families and banks in Ralegaon
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील सेंट्रल बैंक ऑफ इंडीया येथे तसेच मौजा रावेरी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब सुषमा संजय डायरे यांच्या घरी भेट दिली. सेंट्रल बँक ही जिल्ह्यातील लीड बँक असून वाढोणा बाजार येथील शाखेला दिलेल्या भेटीदरम्यान अध्यक्षांनी बँक मॅनेजर व उपस्थित असलेले नागरिक यांच्यासोबत अडीअडचणींबाबत चर्चा केली. भेटीमध्ये त्यांनी पिककर्ज वाटपाचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याच्या सूचना केल्या तसेच बँकेत येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेयर व इतर सोईसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या.
यवतमाळात भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने हत्या
रावेरी येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेटीत त्यांनी कुटुंबीयांची विचारपूस व चर्चा केली. भेटीदरम्यान तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बाल विकास विभागाचे अधिकारी, सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आदी उपस्थित होते. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला 1 लाखाची शासकीय मदत तसेच संजय गांधी निराधार योजनेचा, अन्यधान्य योजनेचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
कृषी विभागाने डीबीटीमार्फत कापुस ठेवण्याची कोट, बियाणे व औषध या योजनांचा लाभ तातडीने देण्याच्या सूचना केल्या. पंचायत समितीने घरकुल, शिलाई मशीन, विहीर यापैकी जे नियमात बसेल त्या योजनांचा लाभ द्यावा. पशुसंवर्धन विभागाने शेळी, म्हशी, दुधाळ जनावरे योजनेचा लाभ द्यावे. महिला व बालविकास विभागाने शेतकरी आत्महत्याग्रस्ते कुटुंबांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना, बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याबाबत सूचना अध्यक्षांनी केल्या.
सर्व शासकीय विभागांनी स्वतः पुढाकार घेऊन या कुटुंबांना विविध योजनेचा लाभ देण्यासोबतच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. बालविकास कार्यालय तसेच जिल्हा बाल सरंक्षण कक्षाच्यावतीने अविनाश पिसुरडे व मोहन मेघावत यांनी रावेरी येथील महिला कुटुबांची भेट घेतली व बालसंगोपन योजनेबाबतचा अर्ज दिला तसेच सर्व कागदपत्रांची माहिती दिली. लवकरच बालसंगोपन योजनेचा लाभ मंजुर करण्यात येईल, असे सांगितले.
