Rajura police arrest two two-wheeler thieves
चंद्रपूर :- राजुरा पोलीसांनी दोन दुचाकी चोरांना सापळा रचून अटक केली असून त्यांच्या कडून 4 दुचाकी सहित 3 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अक्षय चंद्रशेखर ताजने (23 वर्ष) व अजय विष्णु कुशवा (23 वर्ष) दोन्ही रा. राजुरा असे आरोपींचे नाव आहे. Bike Theft arrested
राजुरा पोलीसांना 26 मे 2025 रोजी पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत दोन इसम काळया रंगाची कलर केलेली, बिना नंबरची गाडी घेवुन विकण्याकरीता ग्राहक शोधत फिरत असल्याची गोपनिय माहिती वरुन सदर इसमांचा शोध घेवुन सापळा रचून वाहनाची तपासणी केली असता सदर मोटार सायकल पोलीस स्टेशन राजुरा Police Station Rajura येथील गुन्हयातील चोरीची असल्याने आरोपी अक्षय चंद्रशेखर ताजने व अजय विष्णु कुशवा दोन्ही रा. राजुरा यांना अटक करुन त्यांचेकडे गुन्हयासंबंधाने सखोल चौकशी केली असता त्यांनी बल्लारपूर व वरोरा येथील त्यांच्या साथीदाराचे मदतीने वेगवेगळ्या ठिकाणातून वाहने चोरी केल्याचे कबूल केले. Chandrapur Crime यावरुन आरोपी कडुन एकुण 4 मोटार सायकल बिना नंबर प्लेटची ज्यात एक बुलेट, दोन हिरो स्पेल्न्डर, एक पॅशन असा एकुण 3 लाख 70 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे. 4 two – wheelers and valuables worth Rs 3 lakh 70 thousand seized
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, पोलीस अंमलदार विक्की निर्वाण, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, शरद राठोड, आनंद मोरे यांनी केली आहे.
