Monday, May 25, 2026
HomeAcb Trapग्रामीण पाणी पुरवठा चे कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक व परिचर अडकले जाळ्यात

ग्रामीण पाणी पुरवठा चे कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक व परिचर अडकले जाळ्यात

Executive Engineer of Rural Water Supply, Senior Assistant and Attendant caught in the bribery

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या ‘जल जीवन मिशन’ अभियाना अंतर्गत जिवती येथील कंत्राटदाराने जिवती व राजुरा तालुक्यातील पाणी पुरवठा संबंधित केलेल्या कामांची काही प्रमाणात देयके मंजूर झाल्याने ती बिले काढून देण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांच्या मदतीने 4 लाख 20 हजारांची मागणी केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक व कंत्राटी परिचर यांचेवर कारवाई करीत तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. Executive Engineer of Rural Water Supply, Senior Assistant and Attendant caught in the bribery

तक्रारदार जिवती, जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार त्यांचे महाराष्ट्र शासनाब्या ‘जल जीवन मिशन’ कार्यक्रम अंतर्गत तालुका जिवती आणि राजुरा येथील एकूण 23 गावांमध्ये पाणीपुरवठा संबंधी केलेल्या कामांपैकी 10 गावांतील कामांचे बिले ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मंजुरीकरीता सादर केले होते, त्यापैकी 5 गावांचे कामांचे एकुण 43 लाख रूपयांचे बिले तक्रारदार यांना मिळाले. सदर काढून दिलेली बिले व बाकी असलेली बिले काढून देण्याकरिता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांनी स्वतः करीता 4 लाख रुपयांची मागणी करून सदर रक्कम त्यांचे वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांचेकडे देण्यास सांगीतले. तसेच वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी स्वतः करीता 20000 रुपयांची मागणी केली. असे दोघांचे मिळून एकुन 4,20,000 रूपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक यांचे विरुध्द ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली. Anti Corruption Beuro Chandrapur
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ACB प्राप्त तक्रारीवरून दिनांक 7 एप्रिल ते 9 एप्रिल 2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान हर्ष बोहरे, कार्यकारी अभियंता व वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना 4,20,000 रुपयांची लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.
त्यावरून दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सापळा रचून कारवाई दरम्यान वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांनी लाच रक्कम 4,20,000 रूपये पंचासमक्ष स्वतः स्विकारून त्यापैकी 20,000 रूपये स्वतः करीता वेगळे काढुन उर्वरीत 4 लाख रूपये परिचर मतीन शेख यांना कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांना देण्यास सांगीतले यावरून परिचर मतीन शेख यांनी सुशील गुंडावार यांचे सांगणेवरून सदर रक्कम हर्ष बोहरे यांचे घरी नेउन दिली. सदर लाच रक्कम स्वीकानारे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार यांना ताब्यात घेण्यात आले तर लाच रक्कम नेउन देणारे परिचर मतीन शेख यांना ताब्यात घेण्यात आले असुन दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रामनगर, पोलीस स्टेशन जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदर कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो.नि. जितेंद्र गुरनूले, पो. हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, पो.अं. अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा. पो. अं. सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर च्या वतीने करण्यात आले आहे.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular