Three arrested with country-made pistol, live cartridge
चंद्रपूर :- जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जारी केले आहेत त्यानुसार दिनांक 25 मार्च 2025 रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे सपोनि मदन दिवटे हे गुन्हे शोध (DB) पथकासह गस्त घालत असतांना साईबाबा वॉर्ड बल्लारपूर येथे काही युवक देशी बनावटी अग्नीशस्त्र (बंदूक) बाळगून असल्याची माहिती मिळाली. Country-made pistol, live cartridge seized
यावरून पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत आरोपी अभि वाल्मीक (24 वर्ष) रा. दत्तनगर, विनीत नानाजी तावडे (24) रा. बापट नगर ओम भवन जवळ, चंद्रपूर व संकेत रवींद्र येसेकर (24) रा. राजनगर, पठाणपुराजवळ चंद्रपूर यांची झडती घेतली असता त्यांचे जवळ एक देशी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले. Ballarpur Police Station
पोलिसांनी तिघांनाही अटक करून 20 हजार रुपये किमतीचे एक बनावटी लोखंडी पिस्तूल, 2 हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा 1959 च्या कलम 3,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
