Cancer screening camp concluded at Uruvella Chaitya Griha
चंद्रपूर :- आजच्या या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनामध्ये कोणालाच कुणासाठी वेळ नाही सर्वच आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. यातूनही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या बाबींना समोर ठेवून उरुवेला चैत्यगृह सुगत नगर, तुकुम येथे टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर व इंडियन रेडक्रॉस सोसायटी चंद्रपूरचे विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर चे आयोजन करण्यात आले. Cancer Screening Camp
टाटा ट्रस्ट Tata Trust ‘कॅन्सर मुक्त भारतासाठी’ या ब्रीद वाक्याला समोर ठेवून या शिबिरात तूकूम व परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली.
शिबिराची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून व सामूहिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आले. टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष बारबदे यांनी उपस्थित नागरिकांना कॅन्सर रोगाबाबत व बचावासाठी उपाय यावर मार्गदर्शन केले. सोबतच नुकतेच स्त्रियांकरिता उपलब्ध झालेल्या कॅन्सर प्रतिकार लसीबाबत माहिती दिली.
यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते व रेडक्रॉस सोसायटीचे युवा समन्वयक डॉ. पियुष व्ही. मेश्राम यांची उपस्थिती होती.
शिबिरात ब्लड प्रेशर, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉईड, हिमोग्लोबिन, स्त्रियांचे मासिक पाळी संबंधित आजार, कोलेस्ट्रॉल, लिव्हर व किडनीच्या तपासण्या व इतर सर्व रक्त तपासण्या निशुल्क करण्यात आल्या.
यावेळी टाटा हॉस्पिटलचे डॉ. ट्विंकल डेंगळे, सुरज साळुंके, ज्योती मुरमाडकर, वैष्णवी सहारे, रेड क्रॉस चे सुभाष मुरस्कार, आरिफ काझी तसेच सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे नर्सिंग स्टाफ व हिंद लॅबस चे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता त्रिरत्न उपासिका संघाच्या पुष्पा पाझारे, भारती रत्नपारखी, रत्नमाला शेंन्द्रे, धेनु बोधकार, शोभा रायपूरे, माया रामटेके, शीला भगत व उरुवेला चैत्यगृहाचे सुभाष शेंन्द्रे, चंद्रभान अंबादे, महादेव गोवर्धन, मधुकरराव भगत, अरविंद कुमार जनबंधु, मधू दुर्योधन इत्यादींनी परिश्रम घेतले.
