89 kg Marijuana worth Rs 9 lakh seized at Rajura A accused arrested – Rajura police action
चंद्रपूर :- राजुरा – बल्लारपूर मार्गावरील एका घर वजा झोपडीत धाड Police Raid घालून राजुरा पोलिसांनी सुमारे 8 लाख 97 हजार 200 रूपये किंमतीचा 89 किलो 72 ग्राम गांजा MD जप्त असून एका हरीयाणा प्रांतातील आरोपीला अटक केली आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली असून गांजा जप्तीच्या बाबत राजुरा येथे झालेली यावर्षीची ही मोठी कारवाई आहे. Confiscation of marijuana
राजुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गस्त करीत असतांना बल्लारपूर मार्गावरील एका झोपडीत गांजा असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी Rajura Police या झोपडीवर धाड घातली. यावेळी आझाद रामफल सिंग नामक व्यक्ती येथे आढळून आला. झोपडीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा मिळाला. आझाद हा हरीयाणा राज्यातील पानीपत जिल्ह्यातील चुलकाना या गावातील रहिवासी आहे. या प्रकरणी आरोपीवर एनडीपीएस कायद्यान्वये कलम 8 (क) 20 ( ब ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. One accused arrested – Rajura police action
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, उपनिरीक्षक पांडुरंग हाके, उपनिरीक्षक भीष्मराज सोरते, उपनिरीक्षक नरेश उरकुडे, हवालदार किशोर तुमराम, राजनारायन ठाकूर, नूतन डोर्लीकर, वेणू नूत्तलवार, तिरुपती जाधव, महेश बोलगोडवार, रामराम बिंगेवाड, योगेश पिदूरकर, अविनाश बांबोळे, आकाश पीपरे यांनी केली.