Monday, May 4, 2026
HomeMaharashtraसंघटन मजबुतीसाठी भिम आर्मीचा जनजागृती दौरा

संघटन मजबुतीसाठी भिम आर्मीचा जनजागृती दौरा

Bhim Army’s Public Awareness Tour to Strengthen the Organization

चंद्रपूर :- भिम आर्मी या सामाजिक संघटनेच्या मजबुतीकरणासाठी व जनजागृतीसाठी आज शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्ह्यात संघटन विस्ताराला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत व्यापक नियोजन मांडले. Bhim Army’s Public Awareness Tour

बैठकीस संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई अशोक कांबळे, प्रदेश सचिव शंकर मुन, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे तसेच “मी रमाई बोलतेय” या नाटकातील मुख्य भूमिका साकारणारी बालकलाकार शिफा पवार मंचावर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

जिल्हाध्यक्ष जितेंद्र डोहणे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “येत्या दोन महिन्यांत भिम आर्मी संघटन चौपट वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर संघटनेची विचारधारा पोहोचवली जाईल.” त्यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय होऊन संघटन विस्तारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनी आपल्या भाषणात खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या विचारधारेने देशातील युवकांना नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले. “आज देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे. अल्पावधीत संघटन देशभर विस्तारण्यामागे त्यांची नेतृत्व क्षमता कारणीभूत आहे,” असे ते म्हणाले. बहुजन समाजासाठी सक्षम पर्याय म्हणून भिम आर्मीशी मोठ्या संख्येने जोडण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तसेच, बहुजन समाजातील नागरिकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात भिम आर्मी नेहमीच संघर्ष करत राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल खोब्रागडे यांनी प्रभावीपणे केले. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या.

बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular