Saturday, January 18, 2025
HomeMaharashtraस्वातंत्रदिनी गडचांदुर येथे भूषण फुसे यांचा अनोखा उपक्रम

स्वातंत्रदिनी गडचांदुर येथे भूषण फुसे यांचा अनोखा उपक्रम

A unique initiative by Bhushan Phuse at Gadchandur on Independence Day
Huge response to Rath Yatra with drum beats

चंद्रपूर :- स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गडचांदूर येथे महाराष्ट्राच्या मातीतले लाडके वाद्य ढोल ताशांच्या पारंपरिक ठोक्याच्या तालावर सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन तालावर नाचीत स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी ढोल ताशांच्या रथ यात्रेत अनेकांनी सहभाग घेतला.

भूषण फुसे यांची ही संकल्पना गडचांदूर येथे प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळाली ढोल ताशांच्या ठोक्याच्या तालावर नाचणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून महापुरुषांचे समतावादी विचार या माध्यमातून पेरल्या जात असल्याचे फुसे यांनी यावेळी सांगितले. A unique initiative by Bhushan Phuse at Gadchandur on Independence Day

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ब्रह्मस्त नावाचा ढोल ताशांचा रथयात्रेला असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला स्वातंत्र्य मिळून देशाला 75 वर्षे पूर्ण झाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, मात्र जनसामान्यांचे मूलभूत प्रश्न सुटेनासे झाले आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात खनिजांचे साठे मोठे असून मोठमोठ्या कंपन्या उभारण्यात आल्या आहेत, त्यात मात्र स्थानिकांना थारा नाही परप्रांतीयांना येथील कंपन्यात सहभागी करून घेतल्याने स्थानिकांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षण रोजगार आरोग्य यापासून कोणीही वंचित राहणार नाही ही भूमिका हाती घेतल्याचे फुसे यांनी सांगितले.

गडचांदूर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या अनोख्या उपक्रमाची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. रथामध्ये महापुरुषांचे फोटो संविधानाची प्रत व ढोल ताशांच्या गजरात गडचांदुर नगरी दुमदुमली, बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ढोल ताशांचा आवाजाने परिसरात आनंददायी वातावरण निर्माण झाले.

अशा उपक्रमामुळे विधानसभा क्षेत्रात फुसेच्या सामाजिक हित जोपासनारे वातावरण निर्माण झाले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular