Dharna and Mundan movement of private Convent school teachers
Agitation on September 4 to demand justice for convent, CBSE staff and students
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर तर्फे कॉन्व्हेंट, सीबीएसई (इंग्रजी माध्यमाच्या शाळा) येथील कर्मचारी व विध्यार्थ्यांच्या न्याय उचीत मागण्यांसाठी 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते 5 च्या दरम्यान जिला परीषद समोर धरणे व मुंडण आंदोलन करणार असल्याची माहीती म.रा. शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग चे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या आयोजित पत्रपरीषदेत दिली. Dharna and Mundan movement
कर्मचा-यांना 1981 नियम 9 (5) अनुसुची ड प्रमाणे नियुक्ती आदेश व शासनमान्यता देण्यात यावी, दुय्यम सेवा पुस्तकाची प्रत देण्यात यावी, खाजगी कॉन्व्हेंट स्कूल शिक्षक कर्मचा-यांना MEPS एमईपीएस 1981 नुसार पूर्ण वेतन देण्यात यावे, खाजगी कॉन्व्हेंट स्कूल या शाळेत 90 टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून त्यांना एमईपीएस 1977 शालेय कायदयानुसार वैद्यकीय सुविधा व प्रसुती पूर्व वेतनसह रजा देण्यात यावी, कॉन्व्हेंट स्कूल शिक्षक कर्मचारी सेवानिवृत झाल्यानंतर त्यांना ग्रॅच्युइटीचा पूर्ण लाभ देण्यात यावा,
प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल Private Convent School येथे शिक्षण घेत असलेल्या गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यां करीता महाराष्ट्र शासनाद्वारे लागू असलेली राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ देण्यात यावा, शिक्षण उपसंचालक यांच्या 10 ऑगस्ट 2020 च्या आदेश तात्काळ लागू करावा, वारंवार शिक्षण संस्थाचालक एमईपीएस 1981 कायदयांचे उल्लघंन करुन कार्यरत शिक्षक कर्मचा-यांचे आर्थिक व मानसिक शोषन करीत आहे. या करीता शिक्षण संस्थाचालकांच्या विरोधात पीडीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-याला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा नोंदविण्याबाबत व अंतिम निकाल लागेपर्यंत त्याला नोकरीत संरक्षण देण्याबाबत येत्या अधिवेशनात प्रभावी कायदा करण्यात यावा आदि मांगण्यांसाठी धरणा आंदोलन करणार असल्याची माहीती विवेक आंबेकर यांनी दिली. justice for convent, CBSE staff and students
पत्रपरीषदेला विनोद पांढरे, मुधकर मुपीडवार, रामदास गिरडकर, विलास खोंड, दिलीप मेकलवार, वसंत वडस्कर, देविदास चौले, विवेक आम्बेकर उपस्थित होते.