150 Congress and Shiv Sena workers join BJP
चंद्रपूर :- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा तालुक्यात वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील 150 कार्यकर्त्यांनी Congress काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) Shivsena UBT पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 150 Congress and Shiv Sena workers join BJP
गेल्या पंधरा दिवसांत बल्लारपूर विधानसभा मतदार संघामध्ये शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला लागलेली गळती अजूनही कायम आहे. यात आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहे. 150 जणांनी भाजपमध्ये प्रवेश करताच महाविकास आघाडीसाठी MVA अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वेळवा आणि चकठाणा या दोन गावांमधील एकूण 150 जणांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. मौजा वेळवा आणि चकठाणा येथील युवकांनी आज काँग्रेस व शिवसेनेतून (ठाकरे गट) भारतीय जनता पक्षामध्ये BJP ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश घेतला.
शिवसेना ठाकरे गटाचे नयन मोरे या युवा नेत्याच्या माध्यमातून वेळवा येथिल कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये पक्ष प्रवेश घेतला. यावेळी पोंभुर्णा तालुक्यातील प्रमूख सर्व पदाधिकारी उपस्थित होते.