Major Police Crackdown on Illegal Animal Smuggling
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर परिसरात अवैधरित्या जनावरांची वाहतूक Cattle Smuggling करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने LCB मोठी कारवाई करत 27 जनावरे, ट्रक व अन्य साहित्य असा एकूण 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून एकूण 5 आरोपींविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Major Police Crackdown on Illegal Animal Transport
पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार शहरात प्रोव्हीजन, जुगार, मोटारसायकल चोरी, घरफोडीतील आरोपींचा शोध तसेच अवैध जनावर वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत होती. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पडोली ते घुग्घुस मार्गावरील दत्त मंदिराजवळ, खुटाळा येथे सापळा रचण्यात आला. यावेळी अशोक लेलँड कंपनीच्या ट्रक क्रमांक ए.पी. ०७ टी.यू. ३४९९ मध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ट्रकसह २७ जनावरे ताब्यात घेतली.
जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये १७ गायी व १० बैलांचा समावेश असून त्यांचे अंदाजे वय ८ ते १२ वर्षे आहे. जनावरांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना छोटा नागपूर येथील प्यार फाउंडेशनमध्ये सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकरणी दानिश अब्दुल हमीद कुरेशी (वय २२, रा. व्याहाड खुर्द, ता. सावली), समीर उर्फ सोहेल (रा. गोयगाव, ता. वांकडी, जि. आसिफाबाद, तेलंगणा), सादिक कुरेशी (रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर), समीर खान मुसाविर खान (रा. राजुरा, जि. चंद्रपूर), अजीम उर्फ अजु शेख (रा. कागजनगर, तेलंगणा) तसेच ट्रक चालक व मालक अशा आरोपींचा समावेश असून एकास अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई दरम्यान एक जुना अशोक लेलँड ट्रक (किंमत २० लाख रुपये), मारुती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन (किंमत ५ लाख रुपये), २७ जनावरे (किंमत ५ लाख ४० हजार रुपये) तसेच आरोपींचे दोन मोबाईल असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, पोलीस अंमलदार हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, पोलीस शिपाई सुमित बरडे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे कार्तीक खनके व राहुल पोंदे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.
या घटनेचा पुढील तपास पडोली पोलीस ठाणे करीत आहेत.