महाबोधी महाविहार मुक्तीसाठी चंद्रपुरात भव्य शांतीमार्च संपन्न
बौद्ध उपासक उपासिकांची हजारोच्या संख्येनं उपस्थिती
नमो बुद्धाय जय भीमच्या जयघोषाने चंद्रपूर दुमदुमले
चंद्रपूर : बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलन समिती,चंद्रपूर अंतर्गत समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक संघटनांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील बौद्ध विहार मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भव्य चंद्रपूर जिल्हास्तरीय शांतीमोर्चा चे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन भारताचे राष्ट्रपती महोदया, प्रधानमंत्री आणि बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन बौद्धगया महाविहार व्यवस्थापन करिता असलेल्या BT Act 1949 रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहार भारतीय भिक्कुसंघ आणि भारतीय बौद्ध जनतेच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागण्या शासन दरबारी निवेदनातून मांडण्यात आल्या.
सदर मोर्च्यात भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत अनिरुद्ध थेरो आणि भिक्कुसंघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यानंतर शांतीमोर्चा रुपांतर सभेत करण्यात आले सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे मार्शल अशोक टेंभरे होते तर सदर शांतीमोर्चात अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे भारतीय बौद्ध महासभाचे किशोर तेलतुमडे, आनंद वनकर, संदीप सोनोने, समता सैनिक दलाचे अनंत बाबरे, अशोक फुलझेले, धम्मदीप मेश्राम, उज्वला खोब्रागडे, रुपेश वालकोंडे, प्रफुल भगत, रिपब्लिकन पक्षाचे देशक खोब्रागडे, रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशनचे प्रतीक डोर्लीकर, अँड राजस खोब्रागडे, शतकोत्तर समितीच्या निर्मला नगराळे, गीता रामटेके, दिलीप डांगे, बनाईचे राजेश जनबंधू, किशोर सावणे विचार संवर्धन समितीचे चेतन उंदिरवाडे, दिलीप वावरे, राजूभाऊ खोब्रागडे, पीपल्स पार्टीचे न.भा.वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे तनुजा रायपूर, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशनचे राजकुमार जवादे, डॉ. टी डी कोसे थेंब ग्रुपचे राजेश वनकर अँड.रवींद्र मोटघरे प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिकचे हरिदास देवगडे, बहुजन हितकारी सभेचे सुरेश नारनवरे, दुर्गापूरचे सुनील पाटील, मुन्ना आवळे, ज्योती सहारे, प्रेरणा करमरकर, ज्योती शिवणकर, पंचफुला वेल्हेकर, अनिता जोगे, वर्षा घडसे, प्रेमदास बोरकर, यशवंत मुंजमकर, प्रभूदास मावलीकर, धर्मेश निकोसे, तेजराज भगत, अजय धोटे, सचिन पाटील कैलास शेंडे, अंकित खोब्रागडे, युगान ढोले,कैलास बांबोडकर, हर्षल खोब्रागडे, श्रेयस निमगडे, शुभम शेंडे, कपिल गणवीर आदी असंख्य बौद्ध महिला बांधवांची उपस्थिती होती.
