Friday, July 10, 2026
HomeUncategorized'देशभक्ती समूहगान स्पर्धे'साठी १५ जुलैपर्यंत अर्ज

‘देशभक्ती समूहगान स्पर्धे’साठी १५ जुलैपर्यंत अर्ज

देशभक्ती समूहगान स्पर्धेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज’
उपशीर्षक :
राज्यस्तरीय खासदार चषक स्पर्धेत सहभागी होण्याचे महाराष्ट्रातील शाळांना आवाहन

नागपूर :- बाल कला अकादमी, नागपूर व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरात प्रथमच राज्यस्तरीय ‘खासदार चषक आंतरशालेय देशभक्ती समूहगान स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाळांनी १५ जुलै २०२६ पर्यंत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने सलग पाचव्या वर्षी आयोजित होत असलेल्या या स्पर्धेत इयत्ता १ ते ५ (गट अ) आणि ६ ते १० (गट ब) अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटात किमान १० व कमाल १५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून दोन देशभक्तीपर गीते सादर करावी लागतील. त्यापैकी एक गीत शाळेच्या पसंतीचे, तर दुसरे आयोजकांनी दिलेल्या यादीतील असणे बंधनकारक राहील.

प्रत्येक गटासाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्याबाहेरील स्पर्धकांना प्राथमिक फेरीसाठी १ हजार रुपये प्रवास भत्ता, तसेच मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या चमूंना १० हजार रुपयांचा प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्रे तसेच ‘खासदार चषक’ प्रदान करण्यात येणार आहे.

प्राथमिक फेरी ३ व ४ ऑगस्ट, तर अंतिम फेरी व बक्षीस वितरण १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर येथे होणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सौ. मीनल बाविस्कर (मो. ८४८२८७४५०५) व सौ. प्रिया आजम (मो. ७०२०७१४३८५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular