Monday, April 20, 2026
HomeCrimeजिल्ह्यातील सराईत टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई

जिल्ह्यातील सराईत टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई

जिल्ह्यातील सराईत टोळीवर MCOCA अंतर्गत कारवाई
विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी; वरोरा पोलिसांची धडक कारवाई

चंद्रपूर :- जिल्ह्यातील पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे.

दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी प्रसाद यशवंत देशमाने यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरोपी अमिनेश उर्फ गोलू संजय रेड्डी (रा. इंदिरा नगर), प्रणय रतन खातारकर, चेतन नामदेव देवकर, प्रफुल्ल उर्फ पप्पू धनराज वनकर, ओम मधुकर राऊत व सचिन उर्फ रॉबर्ट अशोक धवने (सर्व रा. मालविय वार्ड व देशपांडे पेट्रोल पंप परिसर, वरोरा) यांनी फिर्यादी व बार मॅनेजर विशाल चामाटे यांना लाकडी दांडा, ग्रॅनाईट व प्लायवूड तुकड्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या बॅगेतील ७,२०० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याची तक्रार होती.
या घटनेवरून पोलीस स्टेशन वरोरा येथे अपराध क्र. ८३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान संबंधित आरोपी हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध जिल्ह्यात विविध गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले. काही गुन्हे त्यांनी एकट्याने तर काही टोळी करून केल्याचे समोर आले.

या पार्श्वभूमीवर परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अंतर्गत कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) अन्वये प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर करण्यात आला होता. दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी कलम २३(१)(अ) अन्वये मंजुरी प्रदान करण्यात आली.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे (पो.स्टे. वरोरा) तसेच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सफौ अरुण खारकार, पोहवा सुधीर मत्ते, पोहवा परवरीश शेख (स्था.गु.शा. चंद्रपूर) तसेच पोहवा किशोर बोडे व पोहवा रुपेश मुल्लेमवार (पो.स्टे. वरोरा) यांनी संयुक्तरीत्या तपास पूर्ण केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular