Towards self-reliance through nursery management
चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, येथे संचालक, फलोत्पादन कृषी आयुक्तालय, पुणे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळे व भाजीपाला रोपवाटीका व्यवस्थापन या निःशुल्क व निवासी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन दि २४ ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान करण्यात आले होते. self-reliance through nursery management
प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक २४ फेब्रुवारी रोजी प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, कु. कविता हरिणखेडे, उप विभागीय कृषी अधिकारी वरोरा, सौ.मिली पुसदेकर, सहाय्यक प्राध्यापक ( उद्यानविद्या) यांच्या उपस्थितमध्ये संपन्न झाले होते. सदर प्रशिक्षणात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३० प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.
सदर प्रशिक्षणात रोपवाटीका व्यवसाय संधी व आव्हाने, रोपवाटिकेतील माध्यमे व त्यांचे निर्जंतुकीकरण, प्रमुख फळे व भाजीपाला पिके यांचे रोपवाटीका व्यवस्थापन, रोपवाटिकेतील एकात्मिक पीक संरक्षण, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापण, रोपवाटीकेसाठी शासनाच्या विविध योजना, रोपवाटीकेसाठी शासकीय परवाना, रोपवाटिकेचा आर्थिक ताळेबंद अश्या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच या प्रशिक्षणात भाजीपाला रोपवाटीकेत वाफे तयार करून ते निर्जुंतुक करणे, प्रो ट्रे रोपवाटीका तयार करणे, आंबा, पेरु इ फळपिकांचे विविध पध्दतीने कलम तयार करणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या प्रशिक्षणात डॉ . सुहास पोतदार, प्राचार्य, आ नि कृ म वरोरा, सौ. मिली पुसदेकर, डॉ अनिल भोगावे, डॉ प्रशांत राखोंडे, डॉ स्वाती लोणाग्रे, डॉ.पांडुरंग कोठेकर, सहायक प्राध्यापक, आ. नि. कृ. म, वरोरा, मारुती वरभे, कृषि अधिकारी, वरोरा, या तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा अंतर्गत तालुका फळरोपवाटिका एकर्जूना, या ठिकाणी क्षेत्रीय भेटीचे आयोजन कऱण्यात आले होते.
तीन दिवसीय प्रशिक्षण अत्यंत उत्साहात पार पडले तसेच प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाबाबतीत समाधान व्यक्त केले.
प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी म्हणून मारुती वरभे, कृषी अधिकारी वरोरा व प्रशिक्षण कार्यक्रम संयोजिका सौ. मिली पुसदेकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिल भोगावे यांनी केले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी श्री अनिल चौधरी व श्री सुधीर सोनवणे यांनी सहकार्य केले.