Tuesday, August 11, 2026
HomeAgricultureशिक्षणासोबत शेतीची जबाबदारीही, घोडपेठच्या विद्यार्थ्यांचा हंसराज अहीर यांनी केला गौरव

शिक्षणासोबत शेतीची जबाबदारीही, घोडपेठच्या विद्यार्थ्यांचा हंसराज अहीर यांनी केला गौरव

शिक्षणासोबत शेतीची जबाबदारीही,

घोडपेठच्या विद्यार्थ्यांचा हंसराज अहीर यांनी केला गौरव

 

चंद्रपूर :- शिक्षण घेत असतांनाच आई-वडीलांना शेतीच्या कामात मदत करणाऱ्या घोडपेठ येथील विद्यार्थ्यांची पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी भेट घेऊन त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.

     घोडपेठ येथे पीक पाहणीसाठी गेले असता रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी आपल्या कुंटुंबाच्या शेतीच्या कामात सहभागी होत असल्याचे अहीर यांच्या निदर्शनास आले. यावेळी शिक्षण घेत असलेल्या सुरज चिकटे (B.E), पियुष घरत (Polytechnic), वंश आसुटकर (I.T.I) आणि समीर सुर (I.T.I) या  विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे विशेष कौतुक करत संवाद साधला.

          ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षणासोबतच कुंटुंबाच्या शेतीची जबाबदारीही असते. अशा परिस्थितीत शिक्षणाला प्राधान्य देत आपल्या मातीशी आणि कुंटुंबाशी नाते जपणाऱ्या विद्यार्थ्यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे अहीर यांनी सांगितले.

          शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात मोठी भरारी घेतांना आपल्या मातीशी आणि कुंटुंबाशी असलेले नाते जपणे हीच खरी संस्कृती आहे. या विद्यार्थ्यांची मेहनतसंस्कार आणि आई-वडिलांप्रती असलेली बांधिलकी कौतुकास्पद आहे असे हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले.

          यावेळी अहीर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणात यश मिळवून समाज आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular