चंद्रपूर :- आगामी राजकीय व संघटनात्मक वाटचालीला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने राजुरा येथे काँग्रेसच्या विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. Inauguration of the Congress party’s Assembly constituency public outreach office in Rajura दिवंगत बाळुभाऊ धानोरकर जयंती निमित्त आयुष्मान व आयुष्मान वय वंदना कार्डांचे वाटप
या नव्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रातील नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होऊन जनतेच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राजमाता जिजाऊंच्या नावाच्या 5 नवीन बसचे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण
उद्घाटनप्रसंगी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, सभापती संतोष इंदूरवार, माजी सभापती विकास देवाळकर, मोहसीन अली बंदाली, नगरपरिषद सभापती अनंतकुमार ताजने, नगरसेवक एजाज अहमद, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, ओबीसी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश पावडे, सेवादल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर वाटेकर, भाऊराव चव्हाण, सुरेश मालेकर, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, नगरसेवक गोलू ठाकरे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, माजी सरपंच सोनपतीबाई मडावी, सरपंच जंगु पाटील येडमे, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निरंजन मंडल, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष अशोक राव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश गोडे, विनोद झाडे, लहु बोंडे, मतीन कुरेशी, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, भूषण बानकर, कवडू सातपुते, प्रणय लांडे, उमेश राजुरकर, रोशन आस्वले यांच्यासह काँग्रेसचे विविध विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनतेशी थेट संवाद, कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळ आणि स्थानिक प्रश्नांच्या प्रभावी पाठपुराव्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी तसेच काँग्रेसच्या संघटनात्मक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी कार्यालयाचा उपयोग केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
