Make WCL space available for garden and play ground
चंद्रपूर :- शहरातील इंदिरा नगर येथील बॉम्बे प्लॉट परिसरातील वेकोली ची पडीत असलेली जागा नागरिकांसाठी गार्डन व खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी नितेश गवळे, चंद्रशेखर देशमुख यांनी वेकोली प्रशासन व आमदार किशोर जोरगेवार केली, याची दखल घेत आमदार जोरगेवार यांनी वेंकीला ला जागा उपलब्ध करून देण्याकरिता पत्र दिले आहे. WCL space available for garden and play ground
चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर बॉम्बे प्लॉट परिसरात वेकोलीची सुमारे 10,000 चौरस फूट जागा गेल्या 10 वर्षांपासून पडीत अवस्थेत आहे. ही जागा सध्या पूर्णपणे दुर्लक्षित असून, त्याचा गैरवापर वाढू लागला आहे. या ठिकाणी असामाजिक प्रवृत्तींचा वावर वाढला असून, जुगार खेळणे, मद्यपान करणे आणि इतर गैरकृत्ये सुरु आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे.
या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या असुरक्षित वातावरणामुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. या परिसरातील नागरिक, विशेषतः महिला, मुलं आणि वृद्ध व्यक्ती या असामाजिक प्रवृत्तीमुळे अस्वस्थ झाले आहेत.
सदर जागेचा योग्य वापर करून ती जागा गार्डन आणि खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध झाल्यास परिसरातील नागरिकांना व्यायाम, खेळ, चालणे, सामाजिक संवाद तसेच सुसंस्कृत उपक्रमांसाठी एक चांगली जागा उपलब्ध होईल, यामुळे परिसराच्या विकासासह नागरिकांच्या दृष्टीनेही सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल अशी मागणी नितेश गवळे, चंद्रशेखर देशमुख, आशा देशमुख यांनी वेकोली चे व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे केली तसेच आमदार किशोर जोरगेवार यांना सुद्धा मागणी केली.
मागणीची दखल घेत आमदार जोरगेवार यांनी वेंकीला प्रशासनाला जागा उपलब्ध करुन देण्यात यावी याकरिता पत्र दिले आहे.
वेकोली प्रशासन केव्हा ही जागा उपलब्ध करुन देते याकडे सर्व वॉर्ड वासियांचे लक्ष लागले आहे.