Congress’ grand torch march in Chandrapur on the 13th
चंद्रपूर :- महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने वेळोवेळी आक्षेप घेतलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकारासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या शंकांचे अद्यापही निराकरण झालेले नाही.
याच संदर्भात आज दि. ७ जून २०२५ रोजीच्या लोकसत्ता तसेच अनेक वर्तमानपत्रात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लेख प्रसिध्द करून मुख्य पाच प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. Congress’ grand torch march in Chandrapur
याच संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. Congress aggressively seeks judicial inquiry into Maharashtra Assembly Elections 2024
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारा विरूध्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाने आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतला असून दिनांक १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गांधी चौक ते गांधी चौक असा भव्य मशाल मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने महामहिम राष्ट्रपती आणि महामहिम राज्यपाल यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या मशाल मार्चात माजी विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे जिल्हा निरिक्षक आ. अँड. अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा जिल्हाप्रभारी मुजीब पठाण, माजी खासदार, माजी आमदार, जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा व शहर काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिकांनी देशातील लोकशाही वाचविण्यासाठी या जनआंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी यांचेसह जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन ने केले आहे.
