Saturday, January 24, 2026
HomeMaharashtraचंद्रपूरात डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शरणम गच्छामी महानाट्य चे आयोजन

चंद्रपूरात डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शरणम गच्छामी महानाट्य चे आयोजन

Dr. Babasaheb Ambedkar Buddham Sharanam Gachchami Great drama organized in Chandrapur

चंद्रपूर :- तेलंगाणा राज्यात निर्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शरणम गच्छामी महानाट्याचे आयोजन 3 मार्च 2025 रोजी चंद्रपूर मध्ये करण्यात आले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर अभ्यूदयू आर्ट अकॅडमी नलगोंडा तेलंगणा द्वारा महानाट्य ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धम् शरणम् गच्छामी’ या महानाट्याचा 101 वा प्रयोग चंद्रपूर येथे 3 मार्च 2025 रोजी सायं 6 वाजता चंद्रपूर मध्ये होत आहे.

संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान निर्मितीची त्याग व संघर्षाची गाथा या महानाट्यातून दाखविण्यात येणार आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून तर महापरिनिर्वानापर्यंत, बुद्ध धम्माची दीक्षा व त्यांच्या जीवनातील अनेक संघर्षमय गाथा या महानाट्यातून उद्रुक झालेले आहेत.

चंद्रपूर मध्ये होत असलेल्या या महानाट्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम बुद्धिस्ट गोल्डमॅन डॉ रोहित पिसाळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे हे महानाट्य होणार आहे असे मयूर साखरे, प्रीतम शेंडे, सौ रुपाली वानखेडे, राज कांबळे तोडे, मृणालिनी नगराळे, दीक्षा थूल साव, सौ मोटघरे मॅडम, पराग कांबळे इत्यादींनी प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.

सदर आयोजन प्रा. सुशांत नगराळे, अमित वाघमारे, विनोद देशपांडे, विनयबोधी डोंगरे, पराग कांबळे, पियुष गेडाम, प्रणय गेडाम, धीरज शेंडे, हंसू अलोने, मयूर साखरे, प्रीतम शेंडे व राज कांबळे यांनी केले आहे

‘डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्धम शरणम गच्छामी’ महानाट्य समाजातील व आंबेडकरी प्रेमी, चाहते, संविधान प्रेमी लोकांनी आवर्जून पहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular