Saturday, January 24, 2026
HomeAssembly Electionवंचितच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.

वंचितच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.

VBA workers from Patan join Congress party

चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील मारई पाटण येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवक अध्यक्ष प्रदिप काळे आणि कार्यकर्ते नवनाथ तिगोटे, बळीराम काळे, दिलीप कांबळे, सचिन कांबळे, किशोर कांबळे, विनोद वाघमारे, संदेश कांबळे, धम्मरक्षित वाघमारे, कासीम पठाण यासह अनेक कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

आ. सुभाष धोटे यांनी आपल्या राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयात सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत विकासपुरुष आ. सुभाषभाऊ धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेण्याचा निर्धार व्यक्त केला. VBA workers from Patan join Congress party

यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक हरजित सिंग संधु, जिल्हा महासचिव एजाज अहमद, माजी उपनगराध्यक्ष अश्फाक शेख, दिपक साबने, अमोल कांबळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular