Tuesday, August 25, 2026
HomeMaharashtra२६ ऑगस्टला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक

२६ ऑगस्टला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक

चंद्रपूर :- भारत सरकारच्या २०२७च्या जनगणनेच्या राजपत्रातील प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश नसल्याने, स्वतंत्र ओबीसी कॉलम समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान ठिय्या आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सिंदेवाहीत काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा…….

या आंदोलनाचे नियोजन तसेच ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेस नगर, नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. Important meeting of the National OBC Federation in Nagpur on August 26

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. कोळसा खाणीतील तीव्र ब्लास्टिंग थांबवा…….

 

२०२७च्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे होणाऱ्या ठिय्या आंदोलनाची रूपरेषा, नियोजन आणि पुढील आंदोलनात्मक भूमिका याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

या बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व विंगचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सभासद तसेच विविध ओबीसी संघटना आणि सर्व जात संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular