VBA will contest independent assembly elections
चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधकांच्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने VBA आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करून टाकली आहे. VBA will contest independent assembly elections
पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही नावे जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत वंचितने 11 उमेदवारांची घोषणा केली आहे. Political News
वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीतील मतदारसंघांमध्ये रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव, खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.
या विधानसभा उमेदवारांची नावे जाहीर
रावेर – शमिभा पाटील
सिंदखेड राजा – सविता मुंढे
वाशिम- मेघा किरण डोंगरे
धामणगाव रेल्वे – निलेश विश्वकर्मा
नागपूर दक्षिण पश्चिम – विनय भांगे
साकोली – डॉ. अविनाश नन्हे
नांदेड दक्षिण- फारुक अहमद
लोहा – शिवा नरंगले
छत्रपती संभाजीनगर पूर्व – विकास दांडगे
शेवगाव – किसन चव्हाण
खानापूर – संग्राम माने
दरम्यान, “आमच्यावर काहीही आरोप होत असले तरी आम्ही राज्यात सध्या सर्वच प्रमुख पक्षांचं सुरू असलेलं एकजातीय राजकारण मोडून काढण्यासाठी विविध समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे,” असं या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला किंव्हा महायुतीला समर्थन करतील आणी त्यांचे घटक पक्ष होतील अशी चिन्हे असतांना वंचित ने पुन्हा लोकसभा निवडणुकी प्रमाणे दोघांपेक्षा ‘वंचित’ च राहण्याचे धोरण अवलंबविल्याने ‘युती’ व ‘आघाडी’ च्या चर्चाना पूर्णविराम लागला आहे.