Bold action by Rajura police; two arrested with seven stolen two-wheelers
चंद्रपूर :- राजुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत दोन आरोपींना अटक करून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत सुमारे २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून जिल्ह्यासह तेलंगणातील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. seven stolen two wheelers
राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजाला नवी दिशा देणारे……
राजुरा येथील फिर्यादी प्रियतुंजय आयुषेश बिश्वास यांनी त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे साहील वसंत टेकाम (वय २०) व चेतन दिनेश मिलमिले (वय २१, दोघेही इंदिरानगर, जुनाळा, ता. राजुरा) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपींनी वाहनचोरीची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये राजुरा, रामनगर, कोरपना तसेच तेलंगणातील वांकीडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. सफाई कामगारांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा……..
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो. अ. महेश बोलगोडवार, शफीक शेख, मिलींद जांभुळे, रमेश बस्सी, शरद राठोड राजीव दुबे यांनी केली आहे.
