Saturday, May 23, 2026
HomeCrimeवन्य प्राण्यांची शिकार करणारे दोघे जेरबंद

वन्य प्राण्यांची शिकार करणारे दोघे जेरबंद

Two arrested for hunting wild animals

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या शिकार प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या मोहिमेत LCB स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी मोठी कारवाई केली आहे. ब्रम्हपुरी परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याकडून तीन मृत जंगली डुक्कर, भरमार बंदूक, दारुगोळा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. Two arrested for hunting wild animals

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १८ जुलै रोजी ब्रम्हपुरी-आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचण्यात आला होता. या दरम्यान एका मोपेड वाहनावरून शिकार केलेल्या प्राण्यांची वाहतूक करताना कुंदनसिंग शेरसिंग भुराणी (वय ३१) आणि विजयसिंग सुरतसिंग भुराणी (वय २१ वर्ष) दोघे रा. पेठ वार्ड, ब्रम्हपुरी या दोघांना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातील वाहन तपासले ३ मृत जंगली डुक्कर, १ भरमार बंदूक (अग्नीशस्त्र), दारुगोळा व शिकारसाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले. Local Crime Branch Chandrapur

याप्रकरणी आरोपींविरुद्ध वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९७२ आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त सामग्री वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोअं. गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे, प्रदीप मडावी यांच्या पथकाने केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular