Saturday, January 17, 2026
HomeAgricultureकृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांना मिळाला हळद लागवड व प्रक्रियेचा मूलमंत्र

कृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांना मिळाला हळद लागवड व प्रक्रियेचा मूलमंत्र

Farmers received the basics of turmeric cultivation and processing at the agricultural college

चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, येथे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, आ.नि.कृ.म, वरोरा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत हळद लागवड व प्रक्रिया या विषयावरील निवासी निःशुल्क शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन दि 21 ते 23 ऑक्टोबर 2024 या दरम्यान करण्यात आले होते. Anand Niketan Agricultural College Warora

प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 21/10/2024 रोजी श्री सुधाकर कडू, विश्वस्त महरोगी सेवा समिती वरोरा, डॉ. संदीप लांबे, प्राध्यापक, कृषी विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, सौ. मिली पुसदेकर, सहाय्यक प्राध्यापक ( उद्यानविद्या) यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

सदर प्रशिक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 27 प्रशिक्षणार्थीना हळद लागवड सद्यस्थिती संधी व आव्हाने, हळद लागवड पूर्वतयारी, लागवड पद्धती, आंतरमशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक पीक संरक्षण, हळदी मधील काढणी तथा काढणी पाश्यात व्यवस्थापन, हळद विक्री व्यवस्थापन, हळद व इतर मसाला पिकांसाठी शासकीय योजना या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. basics of turmeric cultivation and processing

यासोबतच या प्रशिक्षणात श्री सुधीर सातपुते, प्रगतिशील हळद उत्पादक, भद्रावती यांच्या हळद प्रक्षेत्रावर क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणात प्रा.डॉ . सुहास पोतदार, आ. नि. कृ. म, वरोरा चे सहायक प्राध्यापक, सौ. मिली पुसदेकर, डॉ. अश्विनी मानकर, श्री. नितीन गजभे, डॉ.प्रशांत राखोंडे, डॉ. अनिल भोगावे,यांनी तसेच श्री मनोज गायधने, समुद्रपुर, श्री मारोती वरभे, कृषी अधिकारी, वरोरा या तज्ञांनी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाच्या समारोपीय सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार ,
यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. मारोती वरभे, कृषी अधिकारी वरोरा, प्रशिक्षण समन्वयक सौ. मिली पुसदेकर हे उपस्थित होते.

अत्यंत उत्साहात पार पडलेल्या प्रशिक्षणा बाबत सहभागी प्रशिक्षणार्थीनी समाधान व्यक्त करीत अश्या प्रशिक्षणाचे आयोजन नियमितपणे शेतकऱ्याकरिता आयोजित करावे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन डॉ. अनिल भोगावे यांनी केले. तर सदर प्रशिक्षणाच्या यशस्वीेतेसाठी श्री राहुल तायडे, सहा. प्रा. आनिकृम, श्री अनिल चौधरी, सौ. मीना अंबाडे यांचे सहकार्य लाभले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular