Monday, November 4, 2024
HomeEducationalजिवती तालुक्यातील आदिवासी शाळा अजूनही दुर्लक्षित
spot_img
spot_img

जिवती तालुक्यातील आदिवासी शाळा अजूनही दुर्लक्षित

Tribal schools in Jivati ​​taluka neglected by the government
Agitation if not getting facilities – Adv. Paromita Goswami

चंद्रपुर :- चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी जनतेच्या हक्कासाठी व त्यांना सर्व सुविधा प्राप्त होण्यासाठी श्रमिक एल्गार संघटना Shramik Elgar मागील 25 वर्षापासुन कार्यरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील आदिवासी गावातील जनतेला हक्कासाठी अजूनही पायपीट करावी लागत आहे. आदिवासी गावांत अजूनही शासन प्रशासनाच्या सावत्र वागणुकीमुळे या भागातील आदिवासिंना आपल्या हक्कापासून दूर रहावे लागत आहे. जिवती तालुक्यातील धनकदेवी, सिंगारपठार, भूरी येसापुर गांवातील शाळांची अतिशय दयनिय परिस्थिती असुन जिला परीषद प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना अजुनही शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप एड. पारोमिता गोस्वामी यांनी आयोजित पत्रपरीषदेत केला आहे. या शाळांना लाभ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. Tribal schools in Jivati ​​taluka neglected by the government

जिवती तालुक्यातील धनकदेवी, सिंगारपठार, भुरी येसापूर या गावातील शाळांची अतिशय दयनीय परिस्थिती असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक योजनेचा लाभ मिळाला नाही. 100 टक्के आदिवासी गाव असून आदिम कोलाम समाज या गावात राहत असतात. विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, गणवेश योजना, बूट पाय मोजे योजना, शालेय पोषण आहार, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या सर्व सुविधेपासून येथील विद्यार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचा आरोप एड. गोस्वामी यांनी केला. Agitation if not getting facilities – Adv. Paromita Goswami

जिवती तालुक्यातील धनकदेवी, सिंगारपठार, भुरी येसापुर हे गाव पेसा अंतर्गत येत असून या गावाकडे लोकप्रतिनिधी, आमदार ,खासदार आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी गावातील समस्या कडे गांभीर्याने घेऊन या आदिवासी गावांचा विकास सुख – सुविधा निर्माण करावा. तरच खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील गावांचा विकास झाला असे समजल्या जाईल. अन्यथा सर्व शासनाच्या योजना आणी घोषणा त्या कागदावरच असून अजूनही दुर्बल भागाचा विकास न होणे या पेक्षा दुसरे दु:ख काय असू शकते.

शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. अनेक शाळा मोडकळीस आले असून कधी धाराशाही होईल अशी विचित्र अवस्था या गावातील शाळांची झाली आहे.

याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विधानसभा क्षेत्रातील आमदार, खासदार, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या वंचित राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येकडे जातीने लक्ष देण्याची मागणी यावेळी एड. पारोमिता गोस्वामी यांनी केली. अन्यथा श्रमिक एल्गारद्वारे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही दिला आहे.

पत्रपरिषदेत विजय सिद्धावार, विमल कोडापे, फुला सिडाम, बापुराव कुमरे, सोमु कुमरे उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular