Monday, November 4, 2024
HomeEducationalसंविधान जागरचा 161 वा उपक्रम सीएसटिपीएस येथे संपन्न
spot_img
spot_img

संविधान जागरचा 161 वा उपक्रम सीएसटिपीएस येथे संपन्न

Constitution Jagar (Wake up) activity celebrated at CSTPS

चंद्रपूर :- भारतीय संविधान Indian Constitution हे जगातील सर्वोत्तम संविधान असून त्याचे महत्व जनमाणसांपर्यत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्थेच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट रोजी चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र CSTPS येथील ट्रेनिंग सेंटर येथे संविधान जागर उपक्रम राबविण्यात आला. Constitution Jagar (Wake up) activity celebrated at CSTPS

संविधान जागर उपक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहाय्यक संस्था चंद्रपूर चे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर, इंजि. शेषराव सहारे, सीएसटीपीएस चे अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. https://youtu.be/uqzH1apOdUg?si=2i6exLWVEh47yqRQ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक सहायक संस्था चंद्रपूर च्या माध्यमातून जिल्ह्यात एक हजार ठिकाणी संविधान जागर उपक्रम राबविण्याचा मानस घेतला असून आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी चंद्रपूर CSTPS Training Center महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशिक्षण सभागृहात 161 वा संविधान जागर उपक्रम राबविण्यात आला. संविधान जागर उपक्रम सीएसटीपीएस येथे साजरा

सदर उपक्रमात अशोक घोटेकर यांनी सर्व उपस्थितांना संविधान प्रास्ताविकेची प्रत वितरित करीत प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले तसेच संविधान जागर उपक्रमाचे महत्व विषद केले.

संविधानिक तरतुदीमुळे सर्वसामान्य, गरीब व सर्व स्तरातील नागरिक सन्मानाने जगू शकते असे स्पष्ट केले तसेच संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून शासनाने घोषित करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संविधानाची निर्मिती व संविधानाचे महत्व यावर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक इंजि शेषराव सहारे यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले.

यावेळी सीएसटीपीएस चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular