On the occasion of Marathwada Liberation Day, teachers were felicitated under the Vinoba Bhave Teacher Support Program
चंद्रपूर :- हैदराबाद निजामशाहीतून मराठवाडा विभाग मुक्त झाला खऱ्या अर्थाने 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झाला, तेव्हापासून कोरपणा, राजूरा व जिवती या तालुक्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा केला जातो.
या दिवसाचे औचित्य साधून विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, अश्विनी सोनवणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर
यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सुरू असलेल्या विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रम अंतर्गत कोरपणा तालुक्यातील ‘पोस्ट ऑफ मंथ ऑगस्ट 2024’ तालुक्याचे मानकरी कैलाश पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवा तर जिल्ह्यातून महावाचन उपक्रमाचे विजेते गोविंद पेद्देवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पेंदाम, गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपना उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपना उपस्थित होते, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड, लोकेश खंडारे उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार सधन व्यक्ती विकास भंडारवार यांनी मानले.
“विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रम शिक्षकांसाठी प्रेरणादायी उपक्रम असून यातून शिक्षकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी प्रत्येक महिन्याला शिक्षकांना प्रोत्साहित केल्या जातं हा एक अभिनव उपक्रम असून यातून शिक्षकांच्या प्रेरणेत नक्कीच वाढ होणार आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास साध्य करता येईल”
सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती कोरपना