May the days of prosperity and prosperity come to the state: MLA Kishore Jorgewar bids farewell to Ganaraya by welcoming the consort Ganesh Mandal
चंद्रपूर :- गणेश विसर्जन Ganesh Visarjan मिरवणुकी दरम्यान आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी गांधी चौक येथील यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचावरून सपत्नीक गणेश भक्तांसह गणेश मंडळांचे स्वागत केले. तसेच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला.
10 दिवसांच्या मुक्कामा नंतर आज गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदा ही नागरिक व गणेश मंडळांच्या स्वागतासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता.
गणेश मंडळ स्वागत मंच्याजवळ पोहचताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले.
राज्याला संपन्नतेचे आणि भरभराटीचे दिवस येवोत अशी मनोकामना बाप्पाला अखेरचा निरोप देतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.