TB-free India campaign at the ArogyaVardhini Center, Pellora
चंद्रपूर :- आरोग्यवर्धिनी केंद्र पेल्लोरा येथे टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत ‘nikshay 100 days campaign’ हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये एकुण ११८ लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली.
त्यापैकी १०७ लोकांचे एक्सरे काढण्यात आले. ११ लोकांचे trunaat साठी नमुने घेऊन पाठविण्यात आले. तर २ लाभार्थ्यांना इंजेक्शन CYTB सुध्दा देण्यात आले. या शिबिराचा विशेष लाभ अनेकांनी घेतला. TB-free India campaign at the ArogyaVardhini Center
यावेळी पीएचसी काढली येथील MO प्रेरणा मॅडम, HA कौरसे , HA चिडे, एचडब्ल्युसी पेल्लोरा येथील CHO डॉ. अक्षय बुर्लावार, ANM वैशाली आसमपल्लीवर, MPW प्रज्वल एकरे, FW- कैलास विभुते, BF कोकिळा गरुडे, आशा- वृंदा टेकाम, अनिता थेरे, सुरेखा बोढे, कल्पना करमनकर, अनिता काळे, निता नांदेकर, डाटा आटरेटर सोनू झाडे, विष्णु, एक्सरे तंत्रज्ञ – शिरीष पुराणिक, निशांत आदींनी मुख्य भुमिका पार पडली.
यावेळी पेल्लोराच्या सरपंच अरुणा झाडे यांनी शिबिरात स्वतःचा एक्सरा काढून शिबिराची सुरूवात केली व गावकऱ्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी कृ. उ. बा. स. संचालक विनोद झाडे, उपसरपंच मंगेश प्रभाकर भोयर, मंगेश वारलु भोयर, नंदकिशोर अडबाले, रामकृष्ण धानोरकर, बालाजी भोयर, गजानन राजूरकर, हरिचंद्र उपरे यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नागरिकांना प्रोत्साहित केले.