Friday, March 21, 2025
HomeChief Ministerशिवरायांच्या अवमान प्रकरणी कठोर कार्यवाही करा - खा. प्रतिभा धानोरकर

शिवरायांच्या अवमान प्रकरणी कठोर कार्यवाही करा – खा. प्रतिभा धानोरकर

Take strict action in Shivaji Maharaj insult case – MP Pratibha Dhanorkar
The case of Shivaji Maharaj’s statue collapsing in Malvan

चंद्रपूर :- सध्याचे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार असून शिवरायांचा Shivaji Maharaj Statue पुतळा कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराची पोल खोल असल्याची भावना खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे शिवरायांचा पुतळा कोसळणे हे म्हणजे शिंदे सरकार च्या नाकर्तेपणाचे लक्षण असून शिवरायांच्या प्रति हे किती गंभीर आहेत, हे दिसून येते.

अवघ्या 8 महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळणे ही बाब महाराष्ट्रासाठी अवमान जनक असून शिवरायांच्या पुतळयाच्या कामात देखील भ्रष्टाचार झाला असावा असे मत प्रतिभा धानोरकर यांनी प्रत्राद्वारे व्यक्त केले. सदर प्रकरणात काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करावा, असे मत प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केले आहे.

सध्याचे सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरले असून स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहे. त्यामुळे महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचार फोफावत चालला आहे. सदर प्रकरणी एकट्या कंत्राटदारावर कार्यवाही करुन शिंदे सरकार ने आपले अपयश लपवू नये. या सदर्भात उच्च स्तरीय चौकशी समिती नेमावी असे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular