Thursday, April 2, 2026
HomeNationalराष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक दोन महानायकांना काँग्रेसकडून अभिवादन

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक दोन महानायकांना काँग्रेसकडून अभिवादन

Congress salutes two great heroes, symbols of national unity

चंद्रपूर :- देशाच्या अखंडतेसाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि लोकशाहीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या दोन महानायकांना भारतरत्न माजी पंतप्रधान आयर्नलेडी स्व. इंदिरा गांधी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजुरा येथे काँग्रेसकडून अभिवादन करण्यात आले. Congress salutes two great heroes, symbols of national unity

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाषभाऊ धोटे यांनी सांगितले की, स्व. इंदिरा गांधी Late Indira Gandhi यांचे बलिदान आणि सरदार पटेल Sardar Patel यांची राष्ट्रीय एकतेसाठीची भूमिका ही भारतीय राजकारणातील सुवर्ण अध्याय आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.

या प्रसंगी उपस्थितांनी स्व. इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, दूरदर्शी आणि प्रेरणादायी कार्याचा स्मरण करत देशसेवेची नवी प्रेरणा घेण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमात राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, शहराध्यक्ष माजी नगरसेवक हरजीतसिंग संधू, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेनेकर, अँड. सदानंद लांडे, साईनाथ बतकमवार, जिल्हा महासचिव एजाज अहमद, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, विमुक्त जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष इंदूरवार, सुदर्शन दाचेवार, भाष्कर येसेकर, संदेश करमनकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, सुधाकर उईके, कुरूमदास पावडे, बोंडे गुरूजी, लटारू नारनवरे, बंडू उपरे, बाबुराव कटाले, धनराज चिंचोलकर, इंदूबाई निकोडे, पुणम गिरसावळे, सुमित्राबाई कुचनकर, सय्यद साबिर, भुषण बानकर, रतन पचारे, मधुकर झाडे, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, निरंजन मंडल, गोलू ठाकरे, सुरज माथनकर, अनंता ताजने, रविंद्र आत्राम, बाळू झाडे, प्रवीण ताकसांडे, रंगनाथ ताकसांडे, देवराव जिवतोडे, समिर देठे, राकेश उपरे, किशोर भोंगळे, रमेश चांदेकर, सुधाकर तोक्कलवार, नागराज कोरम, आकाश इग्रपवार, अश्विन बावनकर यांच्यासह तालुका व शहर काँग्रेस तसेच काँग्रेसच्या सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular