Saturday, May 30, 2026
HomeEducationalपात्र पदवीधारांनी मतदार नोंदणी अवश्य करावी

पात्र पदवीधारांनी मतदार नोंदणी अवश्य करावी

Eligible degree holders must register as voters

पात्र पद्विधरांनी मतदार नोंदणी अवश्य करावी : जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांचे पद्विधरांना आवाहन.

चंद्रपूर :- पदवीधर मतदार नोंदणी अभियान आता अंतिम टप्प्यात आले असून पात्र पदवीधरांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे Former MLA Subhash Dhote यांनी केले आहे. Eligible graduates must register as voters

जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. Graduate Voter Registration Campaign

या अभियानात माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, जिल्हा प्रभारी व नागपूर पद्विधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांच्यासह तालुका स्तरावरील सर्व काँग्रेस नेते सक्रिय सहभागी असून, मतदार नोंदणीबाबत विविध ठिकाणी बैठका, मेळावे आणि संपर्क अभियान आयोजित करण्यात आलेले आहेत.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करत असून, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि शहरी तसेच ग्रामीण भागातही मतदार नोंदणी फॉर्म भरण्याचे कार्य सुरू आहे.

मात्र आता दि. ६ नोव्हेंबर २०२५ ही पद्विधर मतदार नोंदणीची अंतिम तारीख असल्याने सर्व जबाबदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देऊन पात्र पद्विधरांचे अर्ज निश्चितपणे भरून घ्यावेत, असे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांनी कार्यकर्त्यांना तसेच संबंधितांना केले आहे.

ते पुढे म्हटले की, पद्विधर मतदारसंघातील मतदार नोंदणी ही केवळ निवडणुकीची प्रक्रिया नसून, शिक्षित वर्गाच्या प्रतिनिधीत्वासाठीचा एक महत्त्वाचा लोकशाही हक्क आहे.

प्रत्येक पात्र पदवीधराने या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. या अभियानामुळे जिल्ह्यातील पात्र पद्विधरांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे नोंदणी प्रक्रियेला गती मिळत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular