Thursday, April 2, 2026
HomeElectionदोन वेळा डावलणूक तरीही पक्षविचाराशी ठाम

दोन वेळा डावलणूक तरीही पक्षविचाराशी ठाम

Despite being overlooked twice, she remained firm in her commitment to the party’s ideology

चंद्रपूर :- संघटनात्मक निष्ठा, वैचारिक बांधिलकी आणि पक्षशिस्त यांचा आदर्श वस्तुपाठ चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आला आहे. गेल्या २० वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या विविध संघटनांत सक्रिय कार्यरत असलेले भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गणेश रासपायले यांच्या पत्नी सौ. दीपा गणेश रासपायले यांनी महापालिका निवडणुकीसाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेर माघारी घेतला आहे. An exemplary decision demonstrating party loyalty

पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानंतरही संघ व भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याचा ठाम निर्णय घेत त्यांनी ही भूमिका घेतली. विशेष म्हणजे २०१७ आणि आता २०२६ अशा सलग दोन महापालिका निवडणुकांत उमेदवारीपासून वंचित राहूनही त्यांनी कधीही संघविचारधारेविरोधात जाण्याचा विचार केला नाही. Despite being overlooked twice, she remained firm in her commitment to the party’s ideology

लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले गणेश रासपायले यांनी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेत विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महानगर मंत्री पदावर कार्य केले आहे. संघपरिवाराच्या शिस्तीचे, मूल्यांचे आणि राष्ट्रवादी विचारांचे संस्कार त्यांनी कायम जपले.

या निर्णयाबाबत बोलताना रासपायले कुटुंबीयांनी स्पष्ट भूमिका मांडली की,
“पद किंवा सत्ता आमच्यासाठी कधीही सर्वोच्च नव्हती. संघ, पक्ष आणि विचारधारा हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत.”

माजी मंत्री तथा आमदार लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्रजी गांधी सर यांच्या शब्दाचा मान ठेवत, पक्षनिष्ठा आणि संघशिस्त जपत सौ. दीपा गणेश रासपायले यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular