Subhash Dhote’s emotional appeal to voters: This is my last election
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे Subhash Dhote यांच्या प्रचारार्थ शहराच्या मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. अचानक चौक येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा. प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या हस्ते आणि आ. सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सायंकाळी जाहीर सभा घेण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे यांनी ही माझी विधानसभेची शेवटची निवडणूक असून माझ्या संकल्पनेतील सर्वांगसुंदर राजुरा विधानसभा मतदारसंघ Rajura Assembly मला येणाऱ्या काळात निर्माण करण्यासाठी पून्हा सर्वांची साथ हवी आहे. आपण माझ्या सोबत कायमच खंबीरपणे उभी राहिले असून येणाऱ्या काळात आपल्या क्षेत्राला विकासाच्या सर्वोच्च उंचीवर नेण्यासाठी आपण सर्व निश्चितपणे मला पून्हा विजयी करून सेवा करण्याची संधी देणार याची मला पूर्ण खात्री आहे. Subhash Dhote’s emotional appeal to voters
यावेळी खा. प्रतिभा धानोरकर म्हणल्या की, वारंवार शेवटची काळी टाका म्हणून मतं मागणाऱ्यांना न भुलता खऱ्या अर्थाने क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणारे आ. सुभाषभाऊ धोटे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
तर क्षेत्रातील विकासकामांचा ओघ कायम ठेवण्यासाठी आ. सुभाषभाऊ धोटे यांनाच विजयी करण्याचे आवाहन आ. सुधाकर अडबाले यांनी केले.
यावेळी वैभव राव, महेश राखूंडे, शंकर काळे, श्रीकांत तोडासे, रोहीत सूर, प्रितम तोडासे, गोलू पेटकर, विजय कुळसंगे, तौफिक शेख, लक्की सुतसोनकर यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रवादी (श. प.) चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, अरूणभाऊ निमजे, शिवसेना (उभाठा) जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा सविताताई टेकाम, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सागरभाऊ ठाकुरवार, राजु रेड्डी, जेष्ठ नेते विठ्ठलराव थिपे, हंसराज चौधरी, नामदेवराव येरणे, नोगराज मंगरूळकर, सुरेश मालेकार, संभाजी कोवे, विजय ठाकरे, विजय ठाकूरवार, अशोकराव बावणे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, राहुल उमरे, अरविंद मेश्राम, कल्पनाताई निमजे, जयश्री ताकसांडे, अर्चना वांढरे, भारती मडावी, किरण अहिरकर, सुनीता कोडापे, गणेश गोडे, माजी नगरसेवक सचिन भोयर, प्रा. आशिष देरकर, संतोष महाडोळे, रौऊफ खान, धनंजय गोरे, शेख सरवर, शिवाजी वांढरे, रफिक निजामी, मधुकर शेंडे, सतिश बेतावार, प्रकाश निमजे, संजय चिकटे, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, प्रेम बोंडे, सुनील झाडे, आशिष वांढरे, सुरेंद्र खामानकर, सैफ खान, मयूर एकरे, देविदास मून, अनिल सातपुते, महादेव हेपट, प्रितम सातपूते, अतुल गोरे, अक्षय गोरे, प्रणित अहिरकर यासह काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा) आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.